पंतप्रधान मोदी आज उमेदवारी अर्ज भरणार, उद्धव ठाकरे आज वाराणसीत
वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहे. अर्ज दाखल करण्याच्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यसह एनडीएच्या घटक पक्षातील दिग्गज नेते वाराणसीत उपस्थित राहणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अर्ज भरण्यापूर्वी काशीमध्ये बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काल त्यांनी वाराणसीत भव्य रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. भव्य रोड शो नंतर मोदींनी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशीचा कोतवाल म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा कालभैरवचे दर्शन घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारणसी लोकसभा मतदारसंघामधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या वेळी ते पंतप्रधानपदावर असताना आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
