रिझर्व बँक ऑफ इंडिया ने उघड केली माहिती
मुंबई, दि, ३: आरबीआयने माहिती दिली आहे की १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांची नोट मागे घेण्याच्या घोषणेपासून ३० जून २०२३ पर्यंत २.७२ लाख कोटी रुपये म्हणजेच २००० रुपयांच्या ७६ टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत. आरबीआयने सांगितले की, आता फक्त ८४,००० कोटी रुपयांच्या २,००० रुपयांच्या नोटा चलनात उरल्या आहेत. आरबीआयने सांगितले की, बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, १९ मे २०२३ ते ३० जून २०२३ पर्यंत एकूण २.७२ लाख कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. याचा अर्थ ७६ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. आता फक्त ०.८४ लाख कोटी रुपयांच्या नोटा म्हणजेच ८४,००० कोटी रुपयांच्या नोटा चलनात उरल्या आहेत. ३० सप्टेंबर २०२३ ही या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची शेवटची तारीख आहे.
आरबीआयने सांगितले की प्रमुख बँकांकडून डेटा गोळा करण्यात आला आहे, त्यानुसार बँकांमध्ये चलनात आलेल्या २००० रुपयांच्या नोटांपैकी ८७ टक्के बँक खात्यात जमा करण्यात आल्या आहेत. इतर मूल्यांच्या नोटांच्या माध्यमातून केवळ १३ टक्के नोटा बदलल्या गेल्या आहेत. आरबीआयने सामान्य लोकांना पुढील तीन महिन्यांच्या मुदतीचा योग्य वापर करून २,००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची विनंती केली आहे. आरबीआयने म्हटले आहे की नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी नोटा लवकर जमा करा किंवा बदलून घ्या असा सल्ला देण्यात आला आहे.
