आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त आयसीआयसीआय लोम्बार्डतर्फे एमएसएमई क्षेत्रासाठी तीन नवीन विमा पर्यायांची घोषणा
मुंबई, दि. 27: भारतातील आघाडीच्या खासगी जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) तीन नाविन्यपूर्ण विमा पर्याय आणल्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त, आयसीआयसीआय लोम्बार्ड “एमएसएमई सुरक्षा कवच पॉलिसी”, “प्रापर्टी ऑल रिस्क (पार) पॉलिसी,” आणि “आय-सिलेक्ट लायबीलिटी” या तीन नवीन पॉलिसी सादर करून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या एमएसएमई क्षेत्राला आधार देण्याबरोबरच संरक्षण देण्याची आपली वचनबद्धता आणखी बळकट करत आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) 30 टक्के योगदान देणारे आणि 11 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणार्या सुमारे सहा कोटी 30 लाख उद्योगांचा समावेश असलेले एमएसएमई क्षेत्र हे देशाच्या वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावते (स्रोत). व्यवसाय विमा पर्यायांच्या आधीच विस्तारलेल्या आणि सर्वसमावेशक प्रकारांसह, आयसीआयसीआय लोम्बार्डचे उद्दिष्ट एमएसएमई क्षेत्राला उत्तम सेवा देणे, त्यांच्या विविध गरजा पूर्ण करणे आणि सर्वांगीण असे विमा कवच सुनिश्चित करणे हे आहे.
विम्याचे नवीन सादर केलेले पर्याय एमएसएमईंमध्ये जोखीमेविषयी अधिक जागृती करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायांचे प्रभावीपणे रक्षण करण्यासाठी त्यांना सर्वसमावेषक विमा कवचाचा लाभ देण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. “एमएसएमई सुरक्षा कवच पॉलिसी” हा एक एकत्रित विमा पर्याय आहे. तो विम्यासाठी निश्चित केलेल्या धोक्यांपासून मालमत्तेचे नुकसान किंवा नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेला आहे. हे विमा कवच स्टेफी (वादळ-स्टॉर्म, टायफून, चक्रीवादळ-सायक्लोन, टेम्पेस्ट, टोरनॅडोज, हरिकेन्स, पूर-फ्लड) आणि दहशतवाद यासारख्या धोक्यांसाठी पर्यायी विमा कवचाचे फायदे देते. यामुळे व्यवसायांना संरक्षणाची योग्य पातळी निवडण्याची लवचिकता मिळते. शिवाय, पार (PAR) विमा पॉलिसी पर्यायात विशेष उल्लेखित केलेले काही घटक वगळता इमारती, यंत्रसामग्री, मालसाठा आणि फर्निचर यासह अनेक प्रकारच्या मालमत्तांचा समावेश करण्यात आलेला आहे. अपघात किंवा दुर्दैवाने उदभवणाऱ्या आपत्तीपासून या घटकांचे होणारे नुकसान किंवा हानीबाबत हा विमा सुरक्षाकवच प्रदान करते. “आय-सिलेक्ट लायबीलिटी” पॉलिसीमध्ये एसएमई, स्टार्टअप्स, मिड सेगमेंट इंडस्ट्रीज, तत्काळ पॉलिसी जारी करणे, पॉलिसी कव्हर खरेदीत सुलभता आणणे आदी व्यापक सुविधांत आणखी वृध्दी करते.
आयसीआयसीआय लोम्बार्ड ही sme.icicilombard.com च्या माध्यमातून अखंड डिजिटल सुविधा मंच समर्पित करणारी पहिली कंपनी आहे. गतवर्षी याच दिवशी #SalaamMSME ही मोहिम सुरु करून व्यवसाय विमा पर्यायांसाठी प्राधान्याचे भागीदार म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यात कंपनी विमा उद्योगात अग्रणी ठरली आहे. हा डिजिटल मंच एमएसएमईं क्षेत्रातील घटकांना विमा उत्पादनांची ऑनलाइन पध्दतीने खरेदी करणे, नूतनीकरण करणे, मान्यता देणे तसेच दाव्यांची नोंदणी करण्यास अनुमती देते. तसेच जीएचआय, मरीन, दायित्व, अभियांत्रिकी, वर्कमेन कॉम्प, डॉक्टरांसाठी व्यक्तिगत विमा आणि मालमत्ता विमा यासह व्यवसाय विमा पर्यायांची विस्तृत श्रेणी प्रदान करते.
एमएसएमई क्षेत्रासाठी अखंड आणि सर्वसमावेषक विमा सेवेचा अनुभव मिळण्याच्या दृष्टीकोनातून हे विविध पर्याय तयार करण्यात आलेले आहेत. आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सर्व भागीदारांना उपलब्ध असलेला आयई हा मंचही कंपनीने उभा केलेला आहे. हा मंच ग्राहकांना तत्काळ आणि कार्यक्षम पध्दतीने दर सादर करतो तसेच पॉलिसीसुध्दा वितरीत करतो. त्यामुळे एमएसएमई क्षेत्रातील ग्राहकांना अखंड सेवेचा अनुभव मिळतो. याचबरोबर आयसीआयसीआय लोम्बार्डने मरिन आणि वर्कमॅनसाठी विशेष विमा पर्याय तयार करण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा (एआय) वापरसुध्दा केला आहे. त्यामुळे अंडररायटींग, जोखीमेचे अचूक मोजमाप करणे आणि एमएसएमई क्षेत्राला हवे असलेले विमा पर्याय तयार करणे या सर्व प्रक्रियांची व्यवस्थितरित्या सांगड घातली गेली आहे.
आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री यांनी भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याच्या आर्थिक उद्दीष्टात एमएसएमई क्षेत्राच्या असलेल्या प्रमुख भुमिकेवर आपल्या टिप्पणीत भर दिला. ते म्हणाले, “आजच्या लवचिक व्यावसायिक जगात सर्व व्यवसाय विशेषतः एमएसएमई क्षेत्रासाठी अतिशय बळकट जोखीम व्यवस्थापन आणि आपातकालीन व्यवस्था आवश्यकच आहे. या प्रक्रियेत विमा हा मुख्य भूमिका बजावतो. विमा पर्याय अतिशय महत्वाचे वित्तीय संरक्षण प्रदान करण्याबरोबरच व्यवसायात येणारे तीव्र चढउतार आणि अनिश्चिततेत खंबीरपणे उभे राहण्यास लहान व्यवसायांना सक्षम करतो. आमचे नवीन विमा पर्याय हे विविध प्रकारांआधारे एमएसएमई क्षेत्राला सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेले आहेत. त्यात मालमत्तेशी संबंधित जोखीमेकरिता अतिशय व्यापक विमा कवच आणि एकाच विमा योजनेत नानाविध पर्यायांची सुविधा आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त या उत्साही समुदायाच्या उद्योजकतेला आम्ही मनापासून साजरे करतो आणि सलामही करतो.”
विमा प्रवर्तक या नात्याने आयसीआयसीआय लोम्बार्डला लघु किंवा मध्यम उद्योग व्यवसायिकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या जोखमींच्या स्वरूपाची जाणीव आहे. अतिशय अल्प कालावधीत वाढ साध्य करणे, तरलतेवर अधिकाधिक अवलंबित्व आणि धोक्यांचे तात्काळ स्वरूप लक्षात घेऊन, आयसीआयसीआय लोम्बार्डने एमएसएमई आणि स्टार्ट-अपसाठी विशेष अशी सेवा विकसित केली आहे. या सेवेंतर्गत कामकाजाच्या दहा दिवसांत पाच लाख रुपयांपर्यंतचे मालमत्ता आणि मरीनविषयक स्वीकारण्यायोग्य दाव्यांची पूर्तता केली जाते. या सुविधेला अत्याधुनिक कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय), बिग डेटा अॅनॅलिटिक्सचे पाठबळ देण्यात आलेले असून त्याद्वारे अखंड अशी दावेपुर्तता प्रक्रिया राबविली जाते. हा दिपस्तंभ आणखी पुढे नेण्यासाठी अॅक्टीव्ह डॉट एआय या कंपनीबरोबर भागीदारी करण्यात आलेली आहे. अॅक्टीव्ह डॉट एआय हे सॅस आधारित तंत्रज्ञान असून त्याद्वारे व्यावसायिक आणि त्यांचे वितरक, घाऊक विक्रेते आणि पुरवठादारांना समूह विम्याच्या पर्यायांची अखंड सेवा प्रदान करते आणि त्यातून भागीदाराचे हित आणि वृध्दीही सुनिश्चित करते.
याचबरोबर, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण आर्थिक परिसंस्था निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून, आयसीआयसीआय लोम्बार्डने एमएसएमईसाठी विशेषरितीने आखलेल्या कार्यक्रमांतर्गत आपल्या महिला एजंटची नोंदणी केली आहे. या कार्यक्रमात महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विमा पॉलिसींचे फायदे स्पष्ट करण्यासाठी कंपनीच्या अहवालातील निष्कर्षांवर आधारित विमा आणि आर्थिक साक्षरतेवरील वेबिनारचा समावेश आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड आपले कर्मचारी, ग्राहक, एजंट आणि चॅनल भागीदार यांच्यासाठी सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
एमएसएमई हे क्षेत्र सरकार आणि विविध योजनांच्या पाठिंब्याने तसेच सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील सर्वसमावेशक प्रगतीसाठी तयार आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड संशोधन आणि नवकल्पना-समर्थित आर्थिक उत्पादने आणखी सक्षम करून या आशादायक क्षेत्राला शेवटच्या टप्प्यापर्यंत मदतीसाठी तयार आहे.
