दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ
मुंबई, दि. २१: माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सौनिक यांनी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त ‘देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा शक्तीनिशी मुकाबला करण्याची शपथ दिली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
