उद्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या सत्रास प्रारंभ होणार
नवी दिल्ली, दि. १२: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरु होत आहे. या सत्रात एकूण १७ बैठका होणार असून ते ६ एप्रिलपर्यंत चालेल. पहिल्या सत्रात मांडण्यात आलेल्या विविध विभागांच्या मगण्यांचा संसदेच्या स्थायी समितीने अभ्यास केला असून दुसऱ्या सत्रात त्यावर पुढची कारवाई होईल. उद्यापासून हे दुसरं सत्र सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सभागृहाचं कामकाज सुरळीत आणि शांततेने पार पडावं याकरता सहकार्य करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती या बैठकीत करणार आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने ३१ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. पहिल्या सत्रात एकूण १० बैठका झाल्या. त्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभारदर्शक प्रस्ताव मंजूर झाला तसंच २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला.
Source – AIR
