१०.०२.२०२३ पर्यंत गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा २४.०९ टक्के जास्त
निव्वळ परताव्याचे प्रत्यक्ष कर संकलन, १२.९८ लाख कोटी रुपये – गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा १८.४० टक्के जास्त
मुंबई, दि. ११: प्रत्यक्ष कर संकलनाची १० फेब्रुवारी २०२३ पर्यंतची तात्पुरती आकडेवारी स्थिर वाढ नोंदवत आहे. १० फेब्रुवारी २०२३ पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन हे दर्शवते की एकूण संकलन १५.६७ लाख कोटी रुपये आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा २४.०९ टक्के जास्त आहे. निव्वळ परताव्याचे प्रत्यक्ष कर संकलन, १२.९८ लाख कोटी रुपये आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा १८.४० टक्के जास्त आहे.
हे संकलन आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या ९१.३९ % आहे. आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या प्रत्यक्ष करांच्या सुधारित अंदाजांपैकी ७८.६५ % आहे. एकूण महसूल संकलनाच्या बाबतीत कॉर्पोरेट प्राप्तीकर (सीआयटी) आणि वैयक्तिक प्राप्तीकराच्या (पीआयटी) दर वाढीचा विचार करता, सीआयटी वाढीचा दर १९.३३ % आहे तर पीआयटीचा (एसआयटीसह) २९.६३ % आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनात १५.८४ टक्के निव्वळ वाढ आहे आणि पीआयटी संकलनात ती २१.९३ टक्के (केवळ पीआयटी)/२१.२३ % (एसटीटी सह पीआयटी) आहे.
परताव्यापोटी १ एप्रिल २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत २.६९ लाख कोटी जारी करण्यात आले आहेत. ते मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत ६१.५८ % जास्त आहेत.
