Amit & Mitali Wedding
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा रविवारी (२७ जाने.)रोजी लोअर परळ येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये शाही विवाहसोहळा संपन्न झाला.
अमित आणि मिताली या नवदांपत्यांना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, जयदेव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रतन टाटा, नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाबासाहेब पुरंदरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचाही साखरपुडा पार पडला. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर असून तिने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची ती कन्या आहे.
