शेलारांसारखा एहसान फरामोश कोणी नाही, धनंजय मुंडेचे आशिष शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राजकीय पक्षांमध्ये एकमेकांवर खिल्ली उडवण्याची अतितटीची स्पर्धा सुरू आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका केली. याच टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, की काकाच्या आर्शिवादानेच एमसीएच्या अध्यक्ष पदी तुम्ही बसला आहात. त्यांचे उपकार कसे विसरता? असा सडेतोड सवाल देखील शेलार यांना मुंडेंनी केला आहे.
धनंजय मुंडे ट्विटमध्ये म्हणतात की,
एमसीएचा अध्यक्ष म्हणून बसे
या पदासाठी त्याच ‘काकां’चा आशीर्वाद असे
उपकार तयाचे विसरतात कसे?
यांच्या सारखा ‘एहसानफरामोश’ जगात नसे
ओळखा पाहू हे कोण?
भाजपाचे नेते आशिष शेलार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात चांगलच ट्विटवॉर रंगलं असल्याचे पाहायला मिळत आहे.
एमसीएचा अध्यक्ष म्हणून बसे
या पदासाठी त्याच 'काकां'चा आशीर्वाद असे
उपकार तयाचे विसरतात कसे?
यांच्या सारखा 'एहसानफरामोश' जगात नसे
ओळखा पाहू हे कोण?
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 15, 2019
