केंद्र सरकारकडून साखर निर्यात बंदीत आणखी एक वर्षाची वाढ
नवी दिल्ली, दि.३०: केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांची मुदत येत्या ३१ तारखेपासून आणखी एक वर्षाने वाढवली आहे. देशांतर्गत बाजारातून साखरेची उपलब्धता वाढावी, आणि साखरेचा भाव नियंत्रणात रहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे.कच्च्या, रिफाइन्ड आणि पांढऱ्या साखरेवर ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत हे निर्बंध कायम राहतील, असं परदेशी व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. युरोपिय संघ /आणि अमेरिकेत /निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेवर हे निर्बंध लागू नसतील, असं त्यात स्पष्ट केलं आहे.
Source – AIR
