शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला मिळालं ‘ढाल – तलवार’ हे निवडणूक चिन्ह
मुंबई, दि. १२ : एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला निवडणूक आयोगानं ‘ढाल – तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. पीपल्स डेमोक्रेटिक मुव्हमेंट पक्षाला यापूर्वी हे चिन्हं देण्यात आलं होतं. मात्र या पक्षाची मान्यता रद्द करण्यात आल्यानं हे चिन्हं एकनाथ शिंदेच्या पक्षाला निवडणूक आयोगानं दिलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडणूक आयोगानं काल ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलं होतं.
