भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये ५ व्या क्रमांकावर
भारताने ग्रेट ब्रिटनला मागे टाकत जगातल्या ५ मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. एका ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, भारताने या वर्षी, वार्षिक आधारावर ग्रेट ब्रिटनला मागे टाकत ११ व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. यामुळे भारत, आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीच्या मागे आहे.
एका दशकापूर्वी, भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये ११ व्या क्रमांकावर होता, तर ग्रेट ब्रिटन ५ व्या क्रमांकावर होता. असंही सीतारामन म्हणाल्या,
सुधारणा करा, कृती करा आणि परिवर्तन करा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्राला अनुसरून नवभारत यशाची नवी पाने लिहित आहे, असं प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केलं. देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे, असंही ते म्हणाले
