श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २.९० कोटी अमेरीकी डॉलरची मदत मिळणार
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेला कर्ज पुनर्गठन आणि भ्रष्टाचारावरील कारवाईसाठी चार वर्षांच्या कालावधीत २ अब्ज ९० कोटी अमेरीकी डॉलरची मदत देण्याचं मान्य केलं आहे.नाणेनिधी आणि श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आठवडाभर झालेल्या चर्चेनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पीटर ब्रुअर आणि मासाहिरो नोझाकी यांच्या नेतृत्वाखालील नाणेनिधीचं पथक २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत श्रीलंकेत होते.
त्यांनी नाणेनिधीची मदत आणि व्यापक आर्थिक सुधारणा कार्यक्रमावर विस्तृत चर्चा केली.श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असून गगनाला भिडणारी महागाई, डॉलरचा तुटवडा आणि स्थानिक चलनाचे अवमूल्यन, चुकीचे आर्थिक निर्णय आणि अवाढव्य प्रकल्पांसाठी घेतलेली व्यापक कर्जे अशा समस्या भेडसावत आहेत.
