भारताच्या राष्ट्रपती आज ७६व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करणार
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आज (१४ ऑगस्ट, २०२२) ७६व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत.
राष्ट्रपतींच्या भाषणाचे प्रसारण संध्याकाळी ७ वाजल्यापासून आकाशवाणीच्या (AIR) सर्व राष्ट्रीय वाहिन्या तसेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरुन प्रथम हिंदीमधून आणि त्यानंतर इंग्रजीमधून प्रसारित केले जाईल. दूरदर्शनवरील हिंदी आणि इंग्रजीमधील प्रसारणानंतर लगेचच दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रीपतींच्या भाषणाचा अनुवाद प्रसारित केला जाईल. आकाशवाणीच्या संबंधित प्रादेशिक वाहिन्यांवरुन रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित केला जाईल.
