फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे दिशानिर्देश निर्गमित
मुंबई, दि. ११ : विविध वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून कर्ज घेऊन ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आज काही दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. यानुसार सर्व प्रकारच्या कर्जांचे व्यवहार कर्जदार आणि कर्जदात्यांच्या बँक खात्यातचं व्हावेत. यात कुठलाही त्रयस्थ पक्ष किंवा बँक खातं असून नये असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. याप्रकारच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं एका कृतीदलाची स्थापना केली होती. त्याच्या शिफारशी बँकेनं स्वीकारल्या आहेत.
Source – AIR
