भीमा कोरेगांव प्रकरणातले आरोपी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर
मुंबई/नवी दिल्ली : भीमा कोरेगांव प्रकरणातले आरोपी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयानं नियमित जामीन मंजूर केला आहे. ८३ वर्षीय राव यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी वैद्यकीय कारणांवरुन स्थायी जामीन मिळावा, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती.
मात्र ती उच्च न्यायालयानं फेटाळली. ते आत्तापर्यंत हंगामी जामिनावर होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला वरवरा राव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं त्यांना वैद्यकीय कारणांवरुन जामीन मंजूर केला.
अजून पर्यंत आरोप सिद्ध झाले नसून वरवरा यांच्या प्रकृतीत अजून पर्यंत सुधारणा दिसून आली नाही त्यामुळे स्थाई जामीन देण्यात येत आहे. वरवरा राव जामिनाचा गैरवापर करणार नाहीत किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकणार नाहीत, असं न्यायालयानं म्हटलं आहे. हा आदेश उर्वरित आरोपींसाठी जामिनाचा आधार ठरणार नाही.
Source – AIR
