Sonakshi Sinha
वडिलांनी निर्णय घेण्यास उशिर केला – सोनाक्षी सिन्हा
भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. यावर शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने आपले मत मांडले आहे. खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय खूप उशिरा घेतला असल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे.
माननीय अटलजी आणि आडवाणीजी असल्यापासून माझ्या वडिलांनी भाजप पार्टीसाठी काम केलंय. पण पक्षाकडून त्यांना उचित आदर देण्यात आला नाही.’ असं मत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मांडलं आहे.
पक्षांतराचा निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मला वाटतं जर एखाद्या ठिकाणी तुम्ही आनंदी नसाल तर तुम्ही बदल करणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनी नेमकं तेच केलंय. काँग्रेससोबत त्यांना मनासारखं काम करता येईल आणि पक्षात ते एकटे पडणार नाहीत. असेही सोनाक्षीने यावेळी सांगितले.
भाजपने पटनासाहिब इथून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज होते. याचाच फायदा काँगेसने घेत त्यांची नाराजी दुर करून काँग्रेसमध्ये सामील होण्यास सांगितले. पाडव्याचा मुहुर्त साधत शत्रुघ्न सिन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
