मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
नांदेड, दि.१९: राज्यातल्या बऱ्याचशा भागात आज मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव ईथं आज सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणातला उष्मा कमी झाल्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर परिसरात पहाटे साडे सात वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. डोंगरकडा, वारंगा फाटा, रामेश्वर तांडा, दांडेगाव परिसरातही पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या काही भागात दुपारी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.
