स्मार्ट सिटीज अभियानाकडून मुंबई महानगर पालिकेला विशेष पुरस्कार जाहीर
मुंबई: केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालय अंतर्गत स्मार्ट सिटीज अभियानाकडून विशेष उल्लेखनीय पुरस्कार मुंबई महानगर पालिकेला जाहीर झाला आहे. पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागानं व्हॉट्सऍप चॅटबॉट आणि भौगोलिक माहिती प्रणाली यांचा नावीन्यपूर्ण उपयोग करुन मुंबईकरांना ‘सभोवताली असलेल्या सुविधांची माहिती नकाशाबद्ध पद्धतीने उपलब्ध करुन दिल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सूरत इथं येत्या १८ आणि १९ एप्रिलला होणाऱ्या ‘स्मार्ट सिटीजः स्मार्ट अर्बनायझेशन’ या परिषदेत मुंबई महानगर पालिकेला हा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले जाणार आहे.
