स्टार प्रवाह वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत ‘हा’ अभिनेता साकारत आहे बाबासाहेबांची भूमिका
लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचा जीवनप्रवास दाखवणारी एक नवी मालिका सुरू होत आहे.
अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी पु.लं देशपांडे यांची भूमिका सागरनं साकारली होती.
सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात महामानवाने केलेले महानकार्य तसेच महामानवाचे थोर विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेची निर्मिती केली आहे.
या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण ते महामानवापर्यंतचा प्रवास १५ एप्रिलपासून रात्री ९.०० वाजता स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे