वैज्ञानिकांचे कर्तृत्व मोदींना श्रेय कशाला?- राज ठाकरे
भारताच्या अँटी सॅटेलाईट मिसाईलने अवघ्या तीन मिनिटांत लाईव्ह सॅटेलाईट पाडले. या बद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण देशाला दिली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात की, एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन ही बातमी सांगायची काय गरज?
वैज्ञानिकांचे कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
#SpacePower #ASAT #PMAddressToNation @DRDO_India pic.twitter.com/JILw2DcVsb
— Raj Thackeray (@RajThackeray) March 27, 2019
