माझे पैसे घ्या पण ‘जेट’ला वाचवा – विजय मल्ल्या
नवी दिल्ली: आपले पैसे वापरून जेट एअरवेज ला मदत करा अशी मागणी विजय मल्ल्या याने भारतीय बँकांकडे केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने हि मागणी केली आहे. जेटच्या रुपाने किंगफिशरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका असेही विजय मल्ल्या म्हणाला.
विजय मल्ल्याने बरेच ट्विट केले आहेत. काही ट्विटमध्ये त्याने सरकारवर टीकादेखील केली आहे. जेट एअरवेजला मदत केली जात आहे, त्याचप्रमाणे किंगफिशरलाही मदत करायला हवी होती. सरकार दुटप्पी वागत आहे, असे मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.
विजय मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘कर्ज फेडण्यासाठी माझ्या संपत्तीची माहिती मी कर्नाटक उच्च न्यायालयात दिली आहे. मग बँका माझे पैसे घेत का नाहीत. हेच पैसे वापरुन ते जेट एअरवेजला वाचवू शकतात’.
एनडीए सरकार दुट्टपी भूमिका घेत आहे. या सरकारने किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत असताना किंगफिशरला का मदत केली नाही? असा सवाल देखील त्याने उपस्थित केला.
And I repeat once again that I have placed liquid assets before the Hon’ble Karnataka High Court to pay off the PSU Banks and all other creditors. Why do the Banks not take my money. It will help them to save Jet Airways if nothing else.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 26, 2019
