मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून संजय निरुपम यांची उचलबांगडी, मिलिंद देवरा नवे अध्यक्ष
मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मुंबई विभागात रचनात्मक बदल केले आहेत. मुंबई काँग्रेस च्या अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांची नियुक्ती केली आहे. संजय निरुपम यांच्यासाठी हा मोठा धक्का मनाला जातो. ४ वर्ष त्यांनी अध्यक्षपद सांभाळलं पण या काळात काँग्रेस म्हणावी तशी मुंबईत वाढली नाहीच त्याच जोडीला संघटनेतल्या नेत्यांशी जुळवून घेण्यात त्यांना अपयश आले.
मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचे गांधी घराण्याशी घनिष्ट संबंध राहिलेले आहेत. एका काँग्रेस घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्याला हे पद मिळाल्यामुळे काँग्रेस चे विशेषतः निरुपम यांच्या काळात अडगळीत पडलेले नेते सुखावले आहेत.
