छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरे यांचे व्हिडीओ द्वारे अभिवादन
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तिथीनुसार मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन केले. ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात, ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुजरा.
राज ठाकरे यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मिनिटे १० सेकंदाचा असून या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे व्हिडिओतील आवाज खुद्द राज ठाकरे यांचा आहे. राज ठाकरे यांचा आवाज असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुजरा. #ShivajiJayanti pic.twitter.com/Mw9rD8UUP9
— Raj Thackeray (@RajThackeray) March 23, 2019
