राज्यातील ‘या’ विद्यमान खासदारांचा भाजपकडून पत्ता कट
मुंबई: येत्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी आज प्रसिद्ध केली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून राज्यातील एकूण ६ विद्यमान खासदारांचे तिकीट भाजपने कापले आहे.
भाजपने उमेदवाराची निवड करण्यापूर्वी त्यांच्या कामाचा आणि लोकप्रियतेचा आढावा घेतला होता. आढावा घेतल्यानंतर जे खासदार पराभवाच्या छायेत होते त्यांना बदलण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
दरम्यान, ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळणार का, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दुसऱ्या यादीतही ईशान्य मुंबईसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याऐवजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुंबई पालिकेतील नेते मनोज कोटक व आता प्रवीण छेडा यांच्याबरोबर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता अशी अनेक नावे चर्चेत आली आहेत.
भाजपने ज्या विद्यमान खासदारांचे पत्ते कापले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
पुणे – अनिल शिरोळे यांच्या जागी गिरीश बापट
दिंडोरी – हरिश्चंद्र चव्हाण यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या भारती पाटील
अहमदनगर – दिलीप गांधी यांच्या जागी काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखेंना
सोलापूर – शरद बनसोडे यांच्या जागी जयसिद्धेश्वर स्वामी
जळगाव – ए टी (नाना) पाटील यांच्या जागी स्मिता वाघ
लातूर – सुनील गायकवाड यांच्या जागी सुधाकर श्रृंगारे
