१५ ते १८ वर्ष वयोगटातली मुलं उद्यापासून कोविन पोर्टलवर नोंदणी करू शकतात
कोविडप्रतिबंधक लसीकरता १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या पात्र लाभार्थ्यांना उद्यापासून कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल. या वयोगटासाठी लसीकरण सुरु करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबरला केली होती. येत्या सोमवारपासून म्हणजे ३ जानेवारीपासून त्याचा प्रारंभ होईल. कोविनवर नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याचा पर्यायही लाभार्थ्यांना उपलब्ध आहे.
रोगप्रवण लाभार्थ्यांना वर्धक मात्रा देण्याची मोहीम येत्या १० जानेवारीपासून सुरु होणार आहे. असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण मोहिमेचा वेग आणि व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांबरोबर संपर्क वाढवला आहे. आतापर्यंत केंद्राने दीडशे कोटी ६६ लाख मात्रा पुरवल्या असून त्यातल्या १६ कोटी ९४ लाख मात्रा अद्याप लाभार्थ्यांना द्यायच्या बाकी आहेत.
