भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीला आता पुढचा आठवडाभर धक्के देणार – गिरीश महाजन
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या मागोमाग आज रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. विजयासाठी नव्या लोकांना संधी द्यावी लागते, असे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील गरवारे हॉलमध्ये बोलत होते.
काँग्रेस राष्ट्रवादीला पुढचा आठवडाभर आम्ही सुखद धक्के देणार असे म्हणत काही मोठे घडण्याचे संकेत देखील भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी यावेळी दिले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अजून किती दिग्गज नेत्यांची मुले भाजपचा कमळ हाती घेणार आहेत, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.
