मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपात प्रवेश
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखें पाटील याच्यानंंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
रणजितसिंह मोहिते पाटील आता भाजपकडून माढ्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पहिली आणि दुसरी यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. या दोन्ही यादीत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव जाहीर न झाल्याने नाराज झालेले खा. मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
