इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकच्या संस्थेवर आणखी ५ वर्षांची बंदी
इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकची स्वयंसेवी संघटना इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) वर लादलेली बंदी केंद्र सरकारनं आणखी ५ वर्षांसाठी वाढवली आहे. झाकीर नाईक सध्या फरार आहे. ही संस्था देशाच्या सुरक्षेला घातक असल्याने तसेच सामाजिक शांतता आणि सलोख्याला धोका पोहोचवत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं गृहमंत्रालयाच्या आदेशात म्हटलं आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये या संस्थेवर पहिल्यांदा कारवाई करण्यात आली होती.
