दक्षिण आफ्रिकेचे कादंबरीकर डेमॉन गालगुट यांना ‘द प्रॉमिस’ या कादंबरीसाठी यावर्षीचा बुकर पुरस्कार जाहीर
दक्षिण आफ्रिकेचे कादंबरीकर डेमॉन गालगुट यांना ‘द प्रॉमिस’ या कादंबरीसाठी यावर्षीचा बुकर हा प्रतीष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५७ वर्षीय गालगुट यांनी यापूर्वी २००३ आणि २०१० मध्ये या पुरस्काराच्या नामांकनामध्ये स्थान मिळवलं होतं. ‘द प्रॉमिस’ या कादंबरीला वर्णद्वेषातून बाहेर पडत असलेल्या दक्षिण आफ्रिकेची प्रीटोरिया इथली पार्श्वभूमी आहे.
श्वेतवर्णीय स्वार्ट शेतकरी कुटुंबातील चार निधनांच्या घटनांमधून झालेला ऱ्हास या कांदबरीत चितारण्यात आला आहे. यापूर्वी नादीन गोर्डीमेर आणि जेएम कोएत्झी या दक्षिण आफ्रिकी लेखकांना बुकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं, आता १९९९ चे नंतर प्रथमच गालगुट यांच्या नावावर हा पुरस्कार जमा झाला आहे.
Source – AIR
