“आगे आगे देखो होता है क्या”- मुख्यमंत्री
मुंबई: शिवसेना-भाजप युतीची तयारी पूर्ण झाली आहे, भाजपची यादी तयार असून आज किंवा उद्या आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मुखमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातले दिग्गज नेते लवकरच भाजपात येणार असल्याने ‘आगे आगे देखो होता है क्या’ असा इशारा विरोधकांना दिला आहे.
पुढे फडणवीस म्हणाले की, “देशात २०१४ साली लोकसभा निवडणुकांवेळी भाजपची मोठी लाट होती. यावेळी त्याहून मोठी लाट आहे. अनेक पक्षांचे मोठे नेते भाजपत प्रवेश करत आहेत. तर अनेक पक्षांचे प्रमुख नेते भाजपत येण्यास उस्तुक आहेत. सध्या राज्यात महायुतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.”
