‘एनसीबी’ चे संचालक समीर वानखेडे एनडीपीएस विशेष न्यायालयात हजर
मुंबईतल्या क्रूझवरच्या अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबी, अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे आज अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठीच्या एनडीपीएस विशेष न्यायालयात हजर झाले. आपल्यावर झालेले आरोप चुकीचे असून, आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं, वानखेडे यांनी न्यायालयात सांगितलं.
या प्रकरणातले पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर, आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे.
