घरात नजरकैदेत ठेवण्याची सचिन वाझे याची याचिका मुंबईच्या विशेष न्यायालयानं फेटाळली
मुंबई: मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे याची याचिका मुंबईच्या विशेष न्यायालयानं काल फेटाळली. वाझे यांच्यावर नुकतीच हृदय(बायपास) शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून बरं होईपर्यंत आपल्याला तात्पुरतं घरातच स्थानबद्धतेत ठेवावं अशी मागणी वाझे याला याचिकेत केली होती. असं केल्यास तो फरारी होण्याची शक्यता असल्याचं सांगत राष्ट्रीय तपास संस्थेनं या मागणीला विरोध केला.
वाझे याला आता तातडीनं तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलवावं आणि महिनाभर कारागृहाच्या रुग्णालयात ठेवावं असं विशेष न्यायाधीश ए. टी वानखेडे यांनी सांगितलं. मात्र याआधी दिलेल्या निर्देशांनुसार त्यांना घरचं जेवण देण्यास आणि गरज पडल्यास जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यास परवानगी असल्याचं विशेष न्यायालयानं स्पष्ट केलं.
