खूशखबर! कोकण मार्गावर ५२ उन्हाळी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक
कोकण: मध्य रेल्वे मे च्या सुट्टीत कोकणात जाण्यासाठी ५२ उन्हाळी स्पेशल गाडय़ा सुरू करणार आहे. मुंबई ते करमाळी-सावंतवाडी दरम्यान या गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण १६ मार्चपासून सुरू होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी साप्ताहिक (८ फेऱ्या )
ट्रेन क्र. 01015 – ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १९ मे ते ९ जूनदरम्यान दर रविवारी मध्यरात्री १.१० मिनिटांनी सुटेल.
ट्रेन क्र. 01016 – ही विशेष गाडी करमाळीहून १८ मे ते ८ जूनदरम्यान दर शनिवारी दुपारी १२.५० मिनिटांनी वाजता सुटेल.
ट्रेन क्र.01051 – ही स्पेशल ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७मे ते ७ जूनदरम्यान दर शुक्रवारी रात्री ८.४५ मिनिटांनी वाजता सुटणार आहे.
ट्रेन क्र.01052 – ही गाडी करमाळी येथून १९मे ते ९ जूनदरम्यान दर रविवारी दुपारी १२.५० मिनिटांनी सुटणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड साप्ताहिक (१८फेऱया)
ट्रेन क्र. 01037 – विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून ८ एप्रिल ते ३ जूनदरम्यान दर सोमवारी मध्यरात्री १.१० मिनिटांनी सुटेल.
ट्रेन क्र. 01038 – ही विशेष गाडी सावंतवाडी येथून ८ मे ते ६ जूनदरम्यान दर सोमवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १२.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक (१८ फेऱ्या)
ट्रेन क्र. 01045 – ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२ एप्रिल ते ७ जूनदरम्यान दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटणार आहे.
ट्रेन क्र. 01046 – ही गाडी करमाळी येथून १८मे ते ८ जूनदरम्यान दर शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता सुटणार आहे.
