Aaditya Thackeray
‘सीएसएमटी’ पूल दुर्घटनेतील चौकशी अहवाल सर्व मुंबईकरांसाठी खुला असावा – आदित्य ठाकरे
काल सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ स्थानका बाहेरील हिमाचल पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या निर्देशाने तत्काळ चौकशी समिती नेमली. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी व ३० जण जखमी झाले. आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आयुक्त मेहता यांना विनंती केली आहे की पारदर्शकतेसाठी समितीचा अहवाल व जे कोणी ह्यात दोषी आढळतील त्या संबंधितांची माहिती सर्वांसाठी खुली करण्यात यावी. पुढे ट्विट मध्ये ते म्हणाले की आम्ही आधी सांगितल्या प्रमाणे पुन्हा ह्या गोष्टीचा पुनरुच्चार करतो की संबंधितांना कशाही प्रकारची दया दाखविली जाणार नाहीये. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी काल पासून चाललेल्या विरोधकांच्या टिकेला आज अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे.
