अमेरिकी गुप्तहेर संस्था ‘एफबीआय’कडून अंमली पदार्थ विरोधी कारवाईत एकाच वेळी १६ देशांत धाडी
अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा एफबीआयनं जगभरातून आठशे गुन्हेगारांना ताब्यात घेतलं असून ३२ टन अमली पदार्थ तसंच १४ कोटी ८० लाख अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत. एफबीआय संचलित मेसेजिंग ऍपच्या सहाय्यानं सापळा रचून या सर्वांचा शोध घेण्यात आला.
१६ देशांमध्ये धाडी टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. यात अडीचशे शस्त्रं आणि ५५ अत्याधुनिक मोटारी जप्त केल्याची माहिती एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी हेग इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत दिली. या कारवाईसाठी अमेरिकेच्या अंमलीपदार्थविरोधी प्रशासनानं आणि युरोपिय संघाच्या पोलिस यंत्रणांनी मदत केल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
