उलवे येथे माजी शिक्षकांनी वृक्ष लागवड करत साजरा केला जागतिक पर्यावरण दिन
उरण, दि.५(विठ्ठल ममताबादे): पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करणे यासाठी जगभर दरवर्षी ५ जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थे मार्फत उलवे सेक्टर २४, श्री हनुमान मंदिर तलाव परिसरात स्वच्छता अभियान हाती घेतले सोबतीलाच तेथील परिसरात आंबा, कडुलिंब, करंज, जांभुळ आणि काजू अशा देशी वृक्षांची निवड करुन आपल्या गावातील माजी शिक्षकांच्या शुभहस्ते रोपण करण्यात आले.
संस्थेच्या माध्यमातून तलाव परिसरात विविध वृक्ष लागवडीचे कार्य चालुच असुन काही दिवसांतच तेथील मोकळ्या जागी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षक मो. का. मढवी गुरुजी, ना. रा. गायकवाड गुरुजी, काशिनाथ तेलंगे गुरुजी, दत्तात्रेय कोळी गुरुजी, आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
