भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय
आता पेटीएम, एमेझॉन पे, ओला मनी, मोबिक्वीक, फोन पे इत्यादी विविध ऑनलाइन वॉलेटमध्ये ठेवलेले पैसे एटीएम किंवा पॉईंट ऑफ सेल टर्मिनल वापरुन काढता येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल जाहिर केलेल्या सूचनेनुसार अशा वॉलेटमधून एका वेळी दोन हजार रुपये आणि एक महिन्यात जास्तीत जास्त १० हजार रुपये रोख काढत येणार आहेत.
सर्व गैर बँकिंग पेमेंटची प्रीपेड उपकरणं ही सेवा प्रदान करू शकणार आहेत. मात्र अशा व्यवहारासाठी कार्ड किंवा वॉलेट पिन किंवा अन्य प्रमाणीकरण वापरणे बंधनकारक असेल.
रिझर्व्ह बँकेने आत्ता पर्यंत अशा ३७ पीपीआय ना देशभरात परवानगी दिली आहे. आता केवायसी पूर्ण झाल्यानंतर अशा वॉलेटमध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये ठेवता येणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने सर्व पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स सेवा कंपन्यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत इंटर ओपरेबिलिटी म्हणजेच आंतरकार्यक्षमतेसाठी सज्ज होण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
Credits – AIR
