केरळात मॉन्सूनचे आगमन एक दिवस आधीच अपेक्षित
अरबी समुद्रातल्या वादळी स्थितीमुळे मोसमी वाऱ्यांची गतीही वाढण्याची शक्यता असून ते १ जून या आपल्या निर्धारित तारखेच्या १ दिवस आधीच ३१ मे रोजी मॉन्सून केरळ मध्ये दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदमान निकोबार बेटांवर तर मान्सूनचं आगमन २१ मे रोजीच अपेक्षित आहे. २०१८ आणि १९ मध्ये मान्सून, हवामान खात्यानं आपल्या भाकितात वर्तवलेल्या अनुक्रमे २९ मे आणि ६ जून या तारखांनाच केरळमध्ये आला होता.
गेल्या वर्षी मात्र त्यानं हवामान विभागानं काढलेल्या ५ जूनच्या मुहुर्ताच्या ४ दिवस आधीच हजेरी लावली होती. आज यंदाच्या मान्सून बाबतचे सुधारित दीर्घावधी अंदाज जाहीर होणार आहेत त्यात तो महाराष्ट्रात कधी येणार ते कळेल. तशी मान्सूनची महाराष्ट्र आगमनाची तारिख आता १० जून ही मानली जाते.
