पालघर जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या विलगीकरणासाठी पश्चिम रेल्वे सुरू करणार एसी कोच
पालघर: पालघर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी पश्चिम रेल्वे सर्व सुविधा युक्त एसी कोच तयार करत आहे. पालघर रेल्वे स्थानकात २१ कोच उपलब्ध असतील. त्यांच्यावर तागाचं आच्छादन असेल आणि एका डब्यात ९ कूलर असतील.
डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था असेल. प्रत्येक कोच मधे १८ रुग्णांची सोय होईल, ऑक्सीजन सुविधाही उपलब्ध आहे. हे कोच जिल्हा प्रशासनाला उद्या सुपूर्द केले जातील, असं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं.
