५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं (इफ्फी) गोव्यात उद्धाटन
गोवा: ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्धाटन आज गोव्यात दिमाखदार सोहळ्यात माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं. इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर आणि लाइफ टाइम अचिव्हमेंट या दोन पुरस्कारांची त्यांनी घोषणा केली. प्रसिद्ध दिग्दर्शक, कलाकार, विश्वजीत चटर्जी आणि इटालियन सिने मोटोग्राफर व्हिटोरिओ स्टोरॅरो यांना अनुक्रमे हे पुरस्कार देण्यात येणार आहे. जावडेकर पुढे म्हणाले की, करमणूक ही मानवासाठी गरजेची असून विविध कलागुणांचे प्रदर्शन चित्रपटांच्या माध्यमातून करण्यात येतं. हा सोहळा अधिक रंगतदार असावा, यासाठी इफ्फी – गोवा आणि भारत सरकार यांच्या सहभागासह मी खासगी उद्योजकांना आमंत्रित करतो. यावेळी त्यांनी फिल्म बाजारचंही उद्धाटन केलं.
Source – AIR
