पहा : सुदर्शन यांच्या समस्त महिलांना वाळू शिल्पाद्वारे शुभेच्छा
पुरी : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी, ओडिशा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक वाळू शिल्प काढले आहे. या वाळू शिल्पाच्या माध्यमातून ते समस्त स्त्रीवर्गाला महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. ह्या शिल्पात त्यांनी एक मोठा वृक्ष साकारला आहे आणि ह्या वृक्षात महान स्त्रियांचे चेहरे काढले आहेत. तसेच समानतेने विचार करण्याचा, संशोधनातून बदल घडवण्याचा एक अनोखा संदेश समाजाला ते आपल्या वाळू शिल्पातून देत आहेत. नुकतेच त्यांना ‘Outlook Speakout आयकॉन ऑफ ओडिशा’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
