कोविड संबंधीचे सर्व नियम पाळून मध्यप्रदेशात आजपासून ९ वी ते ११ वी चे वर्ग सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रदीर्घ काळानंतर मध्यप्रदेशात आजपासून इयत्ता ९ वी ते ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी शाळा सुरु झाल्या असून त्यासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती अॅप द्वारे नोंदवण्यात येणार असून, शाळेतील प्रार्थनेसह सर्व सामुहिक कार्यक्रमांवर सध्या बंदी असेल.
शाळेतील उपलब्ध वर्ग खोल्या आणि शिक्षकांची संख्या लक्षात घेऊन, इयत्ता ९ वी ते 11 वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शाळा प्रमुखांनी घ्यायचा आहे. तसंच नियमावलीनुसार; या व्यतिरिक्त अन्य निर्णय घेण्यासाठी आज पालक शिक्षक बैठक घेण्याचे आदेशही मध्यप्रदेशच्या सार्वजनिक शिक्षण आयुक्त जयश्री कियावत यांनी दिले आहेत .
