‘दिशा’ कायद्याचे अनुकरण महाराष्ट्रात केल्याबद्दल आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या नेत्याने व्यक्त केला आनंद
महिला सुरक्षेसाठी आंध्रप्रदेश सरकारने तयार केलेल्या दिशा कायद्याच अनुकरण महाराष्ट्रात केल्याबद्दल वायएसआर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार व्ही. विजय साई रेड्डी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या नवीन कायद्या नुसार बलात्कारासारख्या अपराधात, गुन्हा सिद्ध झाला, तर गुन्हेगाराला २१ दिवसाच्या आत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
दिशा कायद्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेड्डी यांची अमरावती इथे भेट घेतली होती.
महाराष्ट्रात दिशा कायदा, शक्ती विधेयकाच्या रुपात, सभागृहात सादर केला गेला असून सध्या व्यापक अभ्यासासाठी तो स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे.
