सोलापूर येथील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो व अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाचे स्वागत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक रणजितसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा १- दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे बक्षिसमूल्य ७ कोटी रुपये आहे.
