प्रस्थापित मराठा नेत्यांमुळे समाजातल्या उपेक्षितांना आरक्षण मिळत नाही – पुरुषोत्तम खेडेकर
सर्वच पक्षांमधल्या प्रस्थापित मराठा नेत्यांमुळे समाजातल्या उपेक्षितांना आरक्षण मिळत नाही, असा आरोप मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे.
ते पदवीधर मतदार संघातल्या निवडणुकीसंदर्भात खेडेकर हे सांगलीत आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तीस वर्षापासून आम्ही हीच मागणी करीत आहोत, अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे.
मात्र तो सोडवण्याची मानसिकता समाजातल्या नेत्यांची नाही, असं ते म्हणाले.
