मनसेचे राज्यभर वाढीव वीजबिलविरोधी आंदोलन; नगरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज राज्यभर जागोजागी वाढीव विजबिलांविरोधात आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सदर आंदोलन न करण्यास प्रशासनाने मनसे नेत्यांना बजावले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी आज मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर येथील विभागीय कार्यालयांवर धडक दिली. अहमदनगर येथील महावितरण च्या कार्यालयात मनसैनिकांनी तोडफोड केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या नावे एक निवेदन केले होते. हे निवेदनही प्रमुख नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्याचा प्रयत्न केला तथापि अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना कार्यालय परिसरात शिरण्यापासून मज्जाव केल्यामुळे हे प्रयत्न विफल ठरले.
मनसेच्या अथक पाठपुराव्यानंतर वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देऊ असं सरकारतर्फे घोषित करण्यात आलं होतं. पण अचानक सरकारने घुमजाव केला आणि सरकार बळजबरीची बोलू लागलं. म्हणूनच ज्या प्रशासनामार्फत भविष्यात सरकार कारवाई करेल त्यांच्यामार्फतच सरकारला इशारा. #मनसे_मोर्चा pic.twitter.com/2DaBegHU7f
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 26, 2020
