नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ
नाशिक: दिवाळीच्या सुट्टीनंतर ७ दिवसांनी उघडलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज काद्यांला चांगला भाव मिळाला. गेल्या आठवड्यात ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दरानं विकल्या गेलेल्या कांद्याला आज सरासरी ४ हजार रुपये भाव मिळाला.
कमी आवक असलेल्या नव्या लाल कांद्याला ४ हजार १०० रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात क्विंटलला ४०० रुपये तर लाल कांद्याच्या दरात हजार रुपयांची वाढ झाली.
