राज्यातील पोलीस पाटील, होमगार्डसाठी खुशखबर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात तसेच होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन, तर होमगार्डना 570 रुपये कर्तव्यभत्ता देण्यास समितीने मान्यता दिली आहे. तसेच या दोन्ही पदावरील कर्मचाऱ्यांना आरोग्य व अटल पेन्शन योजनेचा लाभ देण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आला.
पोलीस पाटील यांना सध्या दरमहा 3 हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. आता यामध्ये वाढ करून साडेसहा हजार रुपये देण्याचा निर्णय समितीमध्ये घेण्यात आला. तर होमगार्डना प्रती दिन 300 रुपये भत्ता देण्यात येत होता. आता त्यामध्ये वाढ करून 570 रुपये करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वयाची मर्यादा 58 वर्षे करण्यात आली आहे.
