पहा रिपब्लिक च्या अर्णब गोस्वामींवरील अटकेवर भाजपकडून कोण काय म्हणालं?
मुंबई: आज पहाटे-पहाटे मुंबई पोलिसांसोबत अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई केली. वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री यांच्या आत्महत्या प्रकरणी ही अटक करण्यात आली. यानंतर दिवसभर सत्ताधारी व विरोधीपक्ष अशा दोन्ही बाजूने ट्विट् युद्ध सुरू झालं. पहा भाजपकडून नेमकं कोण काय म्हणालं ते.
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस
आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम!
आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक.
अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2020
माजी खासदार किरीट सोमैय्या
हम ठाकरे सरकार के पुलिस राज, पत्रकार और सोशल मीडिया एक्टिविस्ट्स के उत्पीड़न की कड़ी निंदा करते है, जो नेवी के अधिकारी की पिटाई करते है, पत्रकारोंको जेल में भेजते है #ArnabGoswami अर्नब गोस्वामीको जिस प्रकार से गिरफ्तार किया ठाकरे सरकार को इसकी कीमत चुकानी पड़ेगी @BJP4India pic.twitter.com/xMTEHDha7X
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 4, 2020
आ. आशिष शेलार
काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार?
दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस…
महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 4, 2020
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
राज्य सरकार विरुद्ध बोलण्याने अर्णब गोस्वामींना अटक झाली, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून जनता तो सहन करणार नाही. आम्ही राज्य सरकारचा तीव्र निषेध करतो! या घटनेनिषेधार्त राज्यातील सर्व जनतेने निषेध व्यक्त करावा!#EmergencyInMaharashtra pic.twitter.com/8UVRhTk6SX
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 4, 2020
