मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करून नव्या सदस्यांचा समावेश करा
मुंबई: मराठा आरक्षण उपसमितीचा मराठा समाजाला काहीही उपयोग झालेला नाही, त्यामुळे ही समिती बरखास्त करून नव्या सदस्यांचा समितीत समावेश करावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार गंभीर नाही, मुळात भूमिका घेण्यातच सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलताना केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आता पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, असंही पाटील यावेळी म्हणाले.
